Thursday, August 17, 2006

तू जवळ असावीसकाळ्याकूट रात्री, तू दिव्यासारखी असावीस
तू अशीच असावीस फ़क्त तू जवळ असावीस

दिवसाच्या सूरवातीला, तू आशेचा किरण असावीस
तू अशीच असावीस फ़क्त तू जवळ असावीस

धैर्याची चोरी होताना, तू पाठ्रराखीण असावीस
तू अशीच असावीस फ़क्त तू जवळ असावीस

अश्रुच्यां नदया वाहताना, तू समुद्र असावीस
तू अशीच असावीस फ़क्त तू जवळ असावीस

आयुष्याच्या संध्याकाळी, तू समाधी असावीस
तू अशीच असावीस फ़क्त तू जवळ असावीस

मागणे एवढेच प्रिये,
तू अशीच असावीस फ़क्त तू नेहमीच असावीस

Tuesday, July 25, 2006

तू


क्षणात हसतेस, क्षणात रुसतेस.. अशी चंद्रकला आहेस तू
भावंनाना माज़्या भरती आणनारा चंद्र आहेस तू..

श्वेत कधी, शाम कधी.. बहुवर्ण आहेस तू
मनातील श्रावणाच्या माझा इन्द्रधनुष्य आहेस तू...

प्रात: कधी, सांज कधी... एक रहस्य आहेस तू...
शंब्दात माझ्या अपूर्ण राहीलेली शेवटची आस आहेस तू..

Wednesday, February 22, 2006

शब्द


कंठातच दाट्तात... कधी डोळ्यात उमटतात
मनातील ह्या लहरी किनारा शोधतच राहतात

ऒठांनी हसतात... तर कधी अबॊलच राहतात
पापण्यांवरचे हे दव असेच विरघळून जातात

अस्तित्वाला शोधतात... आणि स्वत:तच हरवतात
कस्तूरीच्या शोधात मग रानभर धावतात

विचार करताना मग तूझ्याबद्दल... एकच प्रश्न विचारतात
भावनांना माझ्या हे शब्द अपूरेच का वाट्तात...........

Monday, January 02, 2006


मनातील संरीनो बरसुन जा
तहानलेल्या पापण्यांना भेटून जा


आकाशाची भरारी रोजच आहे
घरट्यात माझ्या एकदा विसावून जा


परत येशिल का? हे विचारवे का लागते?
ढ्गाआड चंद्रा एकदा डोकावून जा


शब्द माझे, भाव माझे, माझ मन
ऒठांनी तुझ्या एकदा गाउन जा...

Tuesday, November 29, 2005

चोटू

काल बरयाच दिवसांनी रात्रीच जेवण roommates बरोबर करयचा विचार केला, आणि आम्ही सर्वजण आमच्या घराच्या जवळच असलेल्या BDA च्या Temptation मध्ये गेलो. मस्त पैकी पराठे order केले आणि फस्त हि केले.


Bill pay केले आणि निघालो, इतक्यात मागून एक लाहनसा आवाज कानावर आला "साहब आपका mobile" BDA च्या Temptation मध्ये काम करीत असलेल्या चोटू चा आवाज होता तो. १२-१३ वर्ष वय असलेला, आणि तो माझाच mobile होता. आजकाल मी बरयाच गोष्टी विसरतोय अस मी नाही शंतनु म्हणाला.

मी मागे फिरलो आणि माझा mobile घेतला, चोटू कडे पाहिल आणि thanks boss म्हणालो, क्षंणभर विचार आल कि त्याला १०-२० रुपये देवून त्याच्या प्रमाणिकपंणाच कौतुक कराव, खिशात हात घालूनम परत मागे वळालो पण त्या लाहनग्याच्या नजरेत सिंकदराप्रमाणे जग जिंकल्याच तेज होत त्याच्या प्रामाणिकपणाच, आणि खिशातला हात आपोआप बाहेर आला विचार केला कि हिरवे साहेब जगातली कुठ्लीच दौउलत ह्या प्रामाणिकपणाच मोल नाही लावू शकत.


मनात चोट्या बद्दल आपुलकी आणि स्वत: बद्दल खंत व्यक्त करून मी घरी निघालो.

Monday, November 28, 2005

Back to pavilion

After a long break, its time to start again. I have lots of things to share so just wait and read but will upload it as I get time from my hectic work schedule which I like :)

-Rahul

Friday, October 21, 2005

प्रेम म्हणजे प्रेम असत


प्रेम म्हणजे प्रेम असत
त्यात वाट लागली
कि सगळं सेम असत

नाही तेव्हा बोर होत
Office त आलं की जोरात होत
काम नंसल की cool होत
Project असल की उफाळून येत

कारण

प्रेम म्हणजे प्रेम असत
त्यात वाट लागली
कि सगळं सेम असत

Monitor वर दिसतो तीचा भडकलेला चेहरा
डोळे वटारून म्हणते चालता हो मेल्या
मागून manager देतो हळूच पेहेरा
म्हणतो, आतातरी code लीही साल्या

कारण

प्रेम म्हणजे प्रेम असत
त्यात वाट लागली
कि सगळं सेम असत

Signal वर दिसते दुसर्या च्या गाडीवंर ती
गळ्यात हात घालून त्याच्या बसालेली ती
Signal लाल कि हिरवा काही कळंतच नाही
शुधीवर येताच कुठे आलो हे संमजत नाही

कारण

प्रेम म्हणजे प्रेम असत
त्यात वाट लागली
कि सगळं सेम असत