तू जवळ असावीस

काळ्याकूट रात्री, तू दिव्यासारखी असावीस
तू अशीच असावीस फ़क्त तू जवळ असावीस
दिवसाच्या सूरवातीला, तू आशेचा किरण असावीस
तू अशीच असावीस फ़क्त तू जवळ असावीस
धैर्याची चोरी होताना, तू पाठ्रराखीण असावीस
तू अशीच असावीस फ़क्त तू जवळ असावीस
अश्रुच्यां नदया वाहताना, तू समुद्र असावीस
तू अशीच असावीस फ़क्त तू जवळ असावीस
आयुष्याच्या संध्याकाळी, तू समाधी असावीस
तू अशीच असावीस फ़क्त तू जवळ असावीस
मागणे एवढेच प्रिये,
तू अशीच असावीस फ़क्त तू नेहमीच असावीस

1 Comments:
I really liked ur post, thanks for sharing. Keep writing. I discovered a good site for bloggers check out this www.blogadda.com, you can submit your blog there, you can get more auidence.
Post a Comment
Links to this post:
Create a Link
<< Home