Tuesday, November 29, 2005

चोटू

काल बरयाच दिवसांनी रात्रीच जेवण roommates बरोबर करयचा विचार केला, आणि आम्ही सर्वजण आमच्या घराच्या जवळच असलेल्या BDA च्या Temptation मध्ये गेलो. मस्त पैकी पराठे order केले आणि फस्त हि केले.


Bill pay केले आणि निघालो, इतक्यात मागून एक लाहनसा आवाज कानावर आला "साहब आपका mobile" BDA च्या Temptation मध्ये काम करीत असलेल्या चोटू चा आवाज होता तो. १२-१३ वर्ष वय असलेला, आणि तो माझाच mobile होता. आजकाल मी बरयाच गोष्टी विसरतोय अस मी नाही शंतनु म्हणाला.

मी मागे फिरलो आणि माझा mobile घेतला, चोटू कडे पाहिल आणि thanks boss म्हणालो, क्षंणभर विचार आल कि त्याला १०-२० रुपये देवून त्याच्या प्रमाणिकपंणाच कौतुक कराव, खिशात हात घालूनम परत मागे वळालो पण त्या लाहनग्याच्या नजरेत सिंकदराप्रमाणे जग जिंकल्याच तेज होत त्याच्या प्रामाणिकपणाच, आणि खिशातला हात आपोआप बाहेर आला विचार केला कि हिरवे साहेब जगातली कुठ्लीच दौउलत ह्या प्रामाणिकपणाच मोल नाही लावू शकत.


मनात चोट्या बद्दल आपुलकी आणि स्वत: बद्दल खंत व्यक्त करून मी घरी निघालो.

3 Comments:

At 1:52 AM, December 06, 2005, Blogger Pratik said...

मध्‍यम वर्गीय और उच्‍च वर्गीय लोग ग़रीबों को प्राय: बेईमान भी समझते हैं। लेकिन ऐसी घटनाएँ यह दर्शाती हैं कि छोटू जैसे ग़रीब तबके के लोग भी हमारी ही तरह ईमानदार और आत्‍मसम्‍मान से परिपूर्ण होते हैं।

 
At 5:25 AM, December 30, 2005, Blogger edwardmiller92836966 said...

I read over your blog, and i found it inquisitive, you may find My Blog interesting. My blog is just about my day to day life, as a park ranger. So please Click Here To Read My Blog

 
At 8:46 PM, February 22, 2006, Blogger दिलीप कुलकर्णी said...

कष्ट घेतलेत. आणि धन्यवाद हा प्रसंग सर्वांशी वाटलात. खरच खूपच छान केलत, खिशातला हात रिताच बाहेर काढलात ते. नसतो विकत घेवू शकलो आपण त्याचा प्रामाणिकपणा १०-२० रुपयात, आणी ती त्याची `किंमत'ही नव्हे.
त्याचे ते उपकार तुम्ही कधीही फेडू शकाल, त्याला त्याच्या अडचणीच्या वेळेस आणी गरज असलेली मदत करून. परत एकदा `सलाम' छोटूच्या प्रामाणिकपणाला व तुमच्या `रत्नपारखी' नजरेला.

 

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home