Wednesday, October 05, 2005

असाच एक दिवस असावा


कोण्या एका सकाळी
रीमझीम पाउस यावा
बाल्कनीत तूझ्याबरोबर
हातात coffee चा एक cup असावा

कोण्या एका दुपारी
TV वर एक रडका cinema असावा
पाण्यानी भरलेले तुझे डोळे पुसायला
माझ्या हातात रुमाल असावा

कोण्या एका संध्याकाळी
सूर्य पश्चिमेला असावा
आकाशात गुलाबी छ्टा असताना
श्वासात तुझा गजरा असावा

कोण्या एका रात्री
चंद्र ढगाआड असावा
चादंण्यांच्या प्रकाशात समुद्रकिनारी
हात तुझा माझ्या हाती असावा

असाच एक दिवस असावा.....

0 Comments:

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home