Monday, September 19, 2005

पाउस..

सकळी office ला येताना पावसात सापडलो आणि एका झाडाखाली जाउन थांबलो, जवळच उभ्या असलेल्या एका जोड्प्याला पाहिल आणि गारव्यातल्या काही ओळी आठवल्या,


त्याला पाउस आवडत नाही
तीला पाउस आवडतो
ढग दाटून आल्यावर
तो तीच्या तावडीत सापडतो

मी तुला आवाडते
मात्र पाउस तुला आवाडत नाही
असल तुझ गणित
खरच मला कळत नाही

पाउस म्हणजे चिखल सारा
पाउस म्हणजे मरगळ
पाउस म्हणजे गार वारा
पाउस म्हणजे हिरवळ

पाउस कपडे खराब करतो
पाउस वैतागवाडी
पाउस म्हणजे भिजरी पायवाट
पाउस म्हणजे झारी

पाउस रेंगाळलेली काम
पाउस म्हणजे सूट्टी उगाच
पाउसामध्ये गुपचुप निसटून
मन जाउन बसत ढ्गात

दरवर्षी पाउस येतो
दरवर्षी अस होत
पाउसांमध्ये भांड्ण होवून
लोकामध्ये हस होत

पाउस आवड्त नसला
तरी ती त्याला आवडते
पाउसासकट आवडावी ती
म्हंणून ती ही झगडते

रुसून मग ती निधून जाते
भिजत राहते पाउसात
त्याच आणि तीच भांडण अस
ओल्याचिंब दिवसात

----------------------------गारवा.

0 Comments:

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home