Monday, September 05, 2005

परत येशील का ?



श्रावणांच्या ढगांना बाजूला सारून
चंद्रकोरेसारखी समोर येशील का ?
चातकासारख्या माझ्या प्रेमाखातर
खरचं का गं परत येशील का ?


निळ्याभोर आकाशात भरारी मारण्यास
पंखास माझ्या बळं देशील का ?
यशाच्या माझ्या कौतुक करायला
खरचं का गं परत येशील का ?


चांदण्या रात्रीत स्वप्नातून माझ्या
समोर येशील का ?
नऊवारी साडीत लाजून ईश्श म्हणायला
खरचं का गं परत येशील का ?


आयुषाच्या वाटेवर अडचणीत
धीराचा हात देशील का ?
Go on Rahul,
I am with you....म्हणायला
खरचं का गं परत येशील नां........ ?

0 Comments:

Post a Comment

Links to this post:

Create a Link

<< Home